iGauravMahajan

Anti-India Conspiracy: प्रॉपगॅन्डा ची ऐशी-तैशी

शेतकऱ्यांच्या हिताच्या बुरख्याआड भारतात अशांती पसरवण्याचे हे नवीन कारस्थान आहे हे उघड उघड दिसते. ह्या मध्ये भारतातीलच काही लोक पण आनंदाने सहभागी होत आहेत. हे आपले दुर्दैव आहे.

Read Time: 8 minutes

Farm Laws, Urban Naxals, Anti-India, Amit Shah, Narendra Modi, Fake Campaign, IndiaAgainstPropaganda, Arthiyas, Punjab, Mia Khalifa, Rihanna, Greta Thunberg, Paid Campaign, Anti-Modi

click play to listen to the article

शत–शत आघातो को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा
जग के मस्तक पर रोली सा शोभित हिंदुस्तान हमारा

— अटल बिहारी वाजपेयी

गेल्या काही वर्षांपासून देशात एक नवीन उद्योग प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु दिसतात. लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्याची शक्यता नसल्याने, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक प्रॉपगॅन्डा इंडस्ट्री तयार करण्याचे हे प्रयत्न आहेत. वास्तव्याशी काडीमात्र संबंध न ठेवता, अर्धवट किंवा खोट्या माहितीच्या सहारे लोकांना भ्रमित करण्याचे उद्योग ह्यातील लोक करतात. कलम ३७० असो, CAA असो किंवा सध्या आपण पाहतो आहे ते शेती कायद्या विरोधातील आरडा-ओरड असो – ह्या सर्व गोष्टी ह्याचाच एक भाग आहेत. आपला उद्देश पूर्ण करण्याकरता मोदी द्वेषाने पछाडले हे लोक किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे नुकतेच उघडकीस आले आहे.

२ फेब्रुवारी च्या रात्री कोणा एका रिहाना नावाच्या गायिकेने भारताच्या शेती कायद्या विरोधातील प्रदर्शनकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला. तिला ग्रेटा थंबर्ग नावाच्या पर्यावरणाच्या नावाखाली विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या १८ वर्षीय मुलीने साथ दिली. हे पाहून भारतातील मोदी विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. खरं पाहता, परदेशी वंशाच्या ह्या गायिकेला किंवा स्कूल ड्रॉपआउट ग्रेटाला भारतातील शेती कायद्यानंबद्दल काय माहिती आहे हा प्रश्न जरी तूर्तास बाजूला ठेवला तरी पण एक लक्षात घेतले पाहिजे की कुठला पण देश अथवा त्या देशाचे नागरीक आपल्या देशातील अंतर्गत गोष्टींमध्ये कुठल्याही परदेशी परकीय लोकांचा हस्तक्षेप सहन करत नाहीत. परंतु मोदी द्वेषात आंधळे झालेल्या लोकांना मोदींना गोत्यात आणणे हे देशाच्या अखंडतेहून महत्वाचे वाटते. परंतु ह्या सर्वांच्या दुर्दैवाने ग्रेटा च्या एका चुकीमुळे ह्यांच्या आनंदावर विरजण पडले. ग्रेटा ने अनावधानाने खाजगी असायला पाहिजे अशी काही डॉक्युमेंट (ज्याला “टूलकिट” म्हणले गेले आहे) सार्वजनिक केली आणि एक मोठे देशविरोधी कारस्थान उघडकीस आले. ह्या डॉक्युमेंटमुळे CAA विरोधातील शाहीन बाग चा प्रयोग अयशस्वी झाल्याने आता शेतकऱ्यांच्या हिताच्या बुरख्याआड भारतात अशांती पसरवण्याचे हे नवीन कारस्थान आहे हे उघड उघड दिसते. ह्या मध्ये भारतातीलच काही लोक पण आनंदाने सहभागी होत आहेत. हे आपले दुर्दैव आहे.

ह्या टूलकिट मधून दिसून येते आहे की सर्व कारस्थानामागे देशाबाहेरील अनेक संस्थांचा सहभाग आहे. XR Global (Extinction Rebellion) नावाच्या एका “पर्यावरण” क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी संस्थेला पण सहभागी करुन घेण्यात आल्याचे दिसते. पराली जाळण्याने प्रदूषण होत असताना एक पर्यावरण प्रेमी संस्था प्रदूषणकर्त्यांबरोबर येऊन प्रदूषणविरोधी कायद्याच्या विरोधात काम करते हे अजबच आहे.

टूलकिट मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना “anti-muslim”, “anti-christian” “fascist” म्हणत ग्रंथाची सुरुवात केली आहे. भारताचे शेती कायदे हे संपूर्ण जगासाठी हानीकारक आहेत असे सांगत demonetization आणि कलम ३७० ला सोयीस्कररित्या मध्ये घुसडून त्यावर टीका करण्यात आली आहे. खलिस्थानी आणि पाकिस्तानी वगळता कलम ३७० हटवल्याने शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते आहे?

तसेच एका डॉक्युमेंट मध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या बुरख्याआड भारतातील उद्योगपतींचा (अदानी-अंबानी यांचा विशेष उल्लेख) विरोध करत जगातील सर्वांना अदानी-अंबानी यांच्या उद्योगांवर बहिष्कार घालायला सांगितले गेले आहे. “‘Divest from Ambani-Adani’ and hit ‘them’ where it hurts” असे ह्यांचे म्हणणे आहे. भारतातील उद्योगाला विरोध करुन शेतकऱ्याचे कोणते हित हे साध्य करणार आहेत? हा विरोध शेतकऱ्यांच्या हिताकरिता नाहीये, हा विरोध शेती कायद्यांना नाहीये – हा विरोध आहे तो भारताच्या आर्थिक प्रगतीला.

टूलकिट मध्ये एका ठिकाणी Paid-activists व इतरांनी विडिओ, फोटो व बॅनर कसे तयार करावेत ह्याची सविस्तर माहिती देखील दिली गेली आहे. काही आळशी लोकांकरता म्हणून खास आयती पोस्टर्स देखील बनवून ठेवली गेली आहेत. “Why is India killing us? Why is India killing its minorities? Scrap Modi Sarkar, Modi ko toh mookhiya naal kootega jaake, Hum dekhenge” – शेतकऱ्यांच्या हिताची अशी काही पोस्टर्स ह्या मध्ये बघायला मिळतात.

पुढे जाऊन कुठले hashtags वापरायचे, ट्विट काय असावेत ह्याबद्दल देखील लिहिले आहे. ह्याच गुप्त असायला पाहिजे असलेल्या टूलकिट मधील hashtags आणि ट्विट कुप्रसिद्ध “पत्रकार” रोहिणी सिंग आणि केरळ महिला काँग्रेस यांनी वापरल्याचे उघडकीस आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, तृणमूल कांग्रेस नेते डेरेक ओब्रायन आणि मोदी विरोधासाठी कुप्रसिद्ध बरखा दत्त, फाये डिसोझा सारखे तथाकथित पत्रकारांना हे असेल पोस्टर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरण्यासाठी टॅग करायला सांगितले गेले आहे.

एकेकाळी “सत्ता का खेल तो चलेगा, सरकारे आएगी – जाएगी मगर ये देश रेहना चाहिए, ये लोकतंत्र अमर रेहना चाहिए” म्हणत अटलजी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. एक तो काळ होता, जेव्हा वैचारिक मतभेद असून देखील ह्या राष्ट्राकरिता सर्वजण एक होयचे, आणि आज असा काळ दिसतो आहे की मोदी द्वेषापायी काही लोकांना राष्ट्रविरोधी शक्तींबरोबर हात मिळवण्यात देखील काही गैर वाटत नाहीये.

ह्याच टूलकिट मध्ये पुढे Poetic Justice नावाच्या संस्थेचे २६ जानेवारी ला Global Action Day नावाखाली प्रदर्शने करण्याची योजना एका PPT च्या माध्यमात आहे. ह्या मध्ये निदर्शनाच्या लक्षांमधे एक मुद्दा आहे – “Disrupt “yoga and chai” image of India in general”.

प्रस्ताव ह्या शीर्षकाखाली एक टीप दिली आहे – “Message should be evergreen” so that they focus on protest, but stay relevant even if laws are repealed.” कायदे रद्द करणे हा मुद्दा होता तर मग ह्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा?

Poetic Justice ह्या संस्थेचा संस्थापकांपैकीतील एक, Mo Dhaliwal हा अभिमानाने स्वतःला खलिस्तानी म्हणवतो.

वरील सर्व गोष्टी पहिल्या तर निदर्शन नक्की कोणासाठी आणि कशासाठी आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. हा सर्व उपक्रम केवळ देशात अशांती पसरवून भारताचा प्रगतीरथ रोखण्याचा प्रयत्न आहे. लोकतांत्रिक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकतांत्रिक प्रक्रियेतून निवडून आलेल्या सरकार ला बदमान करण्याचा हा प्रयत्न आहे. आंधळे भक्त म्हणून हिणवणाऱ्या मोदी विरोधकांना देखील आत्मपरीक्षणाची गरज आहे. मोदी विरोधातील प्रत्येक गोष्टीवर प्रफुल्लित होऊन त्यावर विश्वास ठेवण्या आधी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे. मोदी ला विरोध करण्याच्या नादात आपण राष्ट्राला बदनाम तर करत नाही ना हे तपासण्याची गरज आहे.

निशाने पर न सिर्फ मोदी है, न बीजेपी है, निशाने पर हिन्दुस्थान है!

Share this article:

Leave a Comment

0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Recommended For You

Lutyens, Delhi, Khan Market Gang, Presstitutes, Morally Corrupt, Anti-India, Anti-Modi, Partial Journalist, Gandhi Family, Durbaris, Fourth Pillar of Democracy

Feeding Negativity: Politics of Pessimism

The Congress and its Lutyens cabal do not for a moment think before tarnishing India’s image — for, for them, removing Modi and plunging India back to the old corrupt political continuum is the only mode of survival.

Read More →
Urban Naxals, Communists, JNU, Anti-India, Anti-development, Modi Haters, Tukde Tukde Gang, Leftist, Marxist, Umar Khalid, Kanhaiya Kumar, Jignesh Mewani, Shehla Rashid, Parliament Attack, Masood Azhar, Gurumehar Kaur

Nationalism vs Freedom of Expression

Governments can be criticized and should be criticized. But there is a difference between criticizing governments and attacking India. Attacking India is purely anti-national and deserves the harshest punishment.

Read More →
Lutyens, Delhi, Khan Market Gang, Presstitutes, Morally Corrupt, Anti-India, Anti-Modi, Partial Journalist, Gandhi Family, Durbaris, Fourth Pillar of Democracy, Justice Sikri

Lutyens Dubaris: Destroying a Man’s Reputation

Lutyens darbaris under the garb of journalism, have for a long time used the exposure they get to create false narratives. Their hatred for Modi has blinded them to the extent that they are willing to destroy the reputation and life-long work of honest citizens.

Read More →
Lutyens, Delhi, Khan Market Gang, Presstitutes, Morally Corrupt, Anti-India, Anti-Modi, Partial Journalist, Gandhi Family, Durbaris, Fourth Pillar of Democracy

Freedom from Negativity: Towards a New India

The Lutyens believes their visceral hatred for PM Modi gives them the ticket to use any means to destabilize the country in order to weaken Modi. But in spite of all the attempts by this syndicate, Modi has successfully managed to bring in transformation that India much needed.

Read More →
Regional Divide, Anarchy, Divide and Rule, Congress, Nehru, Indira Gandhi, Rahul Gandhi, Hate Politics, British, Dynasty, Lutyens, Bharat Jodo Yatra, Bharat Todo Yatra

Bharat Jodo: A Nation to Divide

Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra is an attempt for starting a new divisive agenda of North vs South, one state vs the other, and importantly, states vs the BJP government at the center. It is an attempt to loosen the bolts of national unity.

Read More →
HMV, Lutyens, Marathi Lutyens, Maharashtra, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Marathi Media, Marathi News

HMV Journalism: Hitjobs on Truth

HMV, His Master’s Voice points towards an ecosystem which creates narratives for their political masters — leaders of Sharad Pawar’s NCP. The HMVs have a single-point agenda: to discredit Devendra Fadnavis at every forum, regional and national.

Read More →
Devendra Fadnavis, देवेंद्र फडणवीस, Maharashtra, Development, केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र, Dynamic Leader, BJP, Bharatiya Janata Party, Chief Minishter, Deputy Chief Minister, Maharashtra Growth Story, 1 Trillion Dollar Economy, पुन्हा-देवेंद्र, Punha Devendra, Devendra Again

मराठी Lutyens: पाकीट पत्रकारिता​

महाराष्ट्रातील काही पत्रकार पत्रकारिता कमी आणि आपल्या राजकीय मालकांकरिता काम करताना जास्त दिसून येतात. अशी परिस्तिथी असताना आपण सर्वांनी ह्या प्रसार माध्यमांना दूर सारून वास्तव्य जाणून घेण्या करिता परिश्रम घेणे आवध्यक आहे.

Read More →
Narendra Modi, Indian Elections, BJP, Bharatiya Janata Party, Elections 2017, Uttar Pradesh, UP Elections, Yogi Adityanath, Double Engine Sarkar

Playing Judge, Jury and Executioner

The rabble rouser is not the Yogi, but the hate mongering journalists and editors who seek to demean the verdict of the masses. Yogi Adityanath will prove to be a popular and effective Chief Minister, overseeing a regime of peace, harmony and justice for all.

Read More →
Lutyens, Delhi, Khan Market Gang, Presstitutes, Morally Corrupt, Anti-India, Anti-Modi, Partial Journalist, Gandhi Family, Durbaris, Fourth Pillar of Democracy, Pulwama, Indian Army, Salute the Soldier, Congress, Anti-India, Fake News, Rahul Gandhi, Breaking News

Debunking Lutyens: Truth behind Modi and Pulwama

India is in the early days of its most vicious election campaign. While we may see the opposition and its darbaris, just like when the Pulwama attack took place, speaking in one voice, it won’t be long, we’ll see them resorting to questioning and doubting today’s air strikes.

Read More →