iGauravMahajan

सरड्याची धाव कुंपणापर्यंतच

एक लक्षात ठेवले पाहिजे कि रावणाने देखील साधूचा वेष धारण करून फसवण्याचेच काम केले होते. ब्रिटिशांनी देखील East India Company मध्ये इंडिया शब्द वापरून भारताला लुटलेच होते. गाढवाने स्वतःला घोडा म्हणले म्हणून काय तो घोड्यासारखा धावू शकत नाही. नाव इंडिया ठेवले म्हणून काही कुणाचे चरित्र सुधारू शकत नाहीत. काँग्रेस पप्रणीत आघाडीने काहीही केले तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी २०२४-साली आयेगा तो मोदी ही…   

Read Time: 5 minutes

click play to listen to the article

नुकताच नरेंद्र मोदी विरोधी काही पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. २०२४-साली केंद्रात सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या या पक्षांनी अनेक बैठकींनंतर देशाच्या विकासाची ब्लुप्रिंट देशासमोर मांडण्याऐवजी देशाला एक क्रीएटीव्ह अक्षरशब्द ― I.N.D.I.A देण्याकरता जनतेने त्यांना निवडून द्यावे असे आवाहन केले. घरणेशाही देशावर लादू  इच्छिणाऱ्या या पक्षांकडून दुसरी अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा. हा अक्षरशब्द पाहून Indira is India, India is Indira या काँग्रेसच्या घोषवाक्याची आठवण होते. Emergency दरम्यान काँग्रेस ने देशाला सांगितले की भारताचे आणि भारतीयांचे अस्तित्व फक्त इंदिरा गांधी यांच्या कृपेने आहे. मोठा काळ लोटला, पक्षाचा होत्याचा नव्हता झाला तरी मानसिकता अजून तीच. अजूनपण आम्ही म्हणजेच भारत, आम्हीच या देशाचे मालक, आम्हीच या देशातील जनतेचे सर्वेसर्वा हा या अक्षरशब्दचा खरा मतितार्थ. ४०० वरून ४० वर हा काँग्रेस पक्ष आला पण अजून माज उतरला नाही.

स्वतःला I.N.D.I.A म्हणवणाऱ्या याच पक्षांनी भारताच्या संरक्षण दलांच्या पाकिस्तान विरोधी हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्जिकल स्ट्राईक ला फर्जिकल स्ट्राईक म्हणणारे यांचेच नेते होते. यांचेच नेते पाकिस्तान ला मोदींना हटवण्याकरिता मींनतवाऱ्या करताना दिसले. यांचेच पंतप्रधान इच्छुक राहुल गांधी परदेशी देशांना भारतात मोदींना हटवण्याकरता हस्तक्षेप करण्याचे आवाहन करताना दिसले. हेच लोकं PFI, IUML सारख्या हिंदू विरोधी आणि देश विघातक संघटनांचे समर्थन करतात. याच लोकांनी कर्नल पुरोहित यांना दहशतवादी ठरवण्याचा कट रचला. हेच लोकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारख्या राष्ट्रवादी संघटनांवर बंदी आणतात. २६/११ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा “RSS कि साजिश” याच लोकांनी म्हणले. यांच्याच नेत्यांनी हिंदू दहशतवाद अशी हिंदू विरोधी खोटी संकल्पना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अजमल कसाबला पकडले नसते तर हे या हल्ल्याला हिंदू दहशतवाद म्हणून पसरवण्यात यशस्वी झाले असते. यांचे नेते भर विधान सभेत दहशतवाद्यांना दहशतवादी म्हणू नका असे आवाहन करतात. कलम ३७० हटवले तर भारताचा तिरंगा फडकू देणार नाही, आम्ही भारतापासून “आझाद” होऊ अशा धमक्या यांच्याच फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती सारख्या नेत्यांनी दिल्या. मुंबईतील आझाद मैदान येथील अमर जवान ज्योती चा अवमान करणाऱ्या रझा अकादमील यांचेच उद्धव ठाकरे भेटतात. यांचेच समाजवादी चे नेते वंदे मातरम म्हणणार नाहीत असे विधान भवनात सांगतात. फक्त नाव I.N.D.I.A ठेवल्याने रक्तात राष्ट्रवादीपणा येत नाही हेच या वरून स्पष्ट होते.

The opposition parties have contradicted the very ideals that the name I.N.D.I.A represents. What lies beneath the surface is a stark irony that can’t be ignored. This video unmasks the paradox behind I.N.D.I.A – an alliance with a name that doesn’t align with its actions.

Raza Academy is infamous for its alleged involvement in inciting violent riots in Azad Maidan in Mumbai on August 11, 2011, where public properties worth 3 crores were damaged by the rampaging rioters, including the much-hallowed Amar Jawan memorial outside the CST.

Congress General Secretary Digvijaya Singh participated in the book inauguration titled “26/11 RSS Ki Saazish?” which aimed to assign responsibility to the RSS for the Mumbai Terror attacks. These attacks were perpetrated by the Pakistan-based Islamic terror group Lashkar-e-Taiba. Notably, Singh was involved in inaugurating the book on two occasions, once in Delhi and then again in Mumbai.

Soon after the 26/11 terror attack, Congress leader Digvijaya Singh along with cheerleaders from Bollywood, at a book launch, which blamed the RSS said ‘Nowhere in this book you can see the involvement of Pakistani terrorists in 26/11’.

अजून दयनीय बाब म्हणजे या अक्षरशब्दचे पूर्ण रूप यांच्याच अनेक नेत्यांना ठाऊक नाही. काँग्रेसचे खर्गे एक सांगतात, तर शरद पवार वेगळे. आपटार्डना १५ दिवस झाले तरी अजून माहीत नाही नक्की काय आहे ते. केंद्रात सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या या पक्षांचे त्या करिताचे गांभीर्य यातून दिसून येते. देश चालवणे हे गोट्या खेळण्याचा खेळ बनवला आहे यांनी.

ही अक्षरशोध मोहीम सुरू असतानाच या आघाडीचे पुरस्करते, नितीश कुमार, यांना आघाडीचा संचालक घोषित न केल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यातच, आजवर नितीश कुमार यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण आता, काँग्रेस सोनिया गांधी यांना आघाडीचा अध्यक्ष बनवण्याच्या मागे आहे. आधीच पहिली बैठक झाल्यावर यांच्या लोकांमध्ये चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांचा पक्ष फुटून यांच्या पासून दूर झाला. तिकडे दिल्ली आणि पंजाब मध्ये अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष काँग्रेस बरोबर युती करू इच्छित नाही. बंगाल मध्ये हिंसेत काँग्रेस चे कार्यकर्ते मारले जातात याला ममता बॅनर्जी दोषी असल्याचे म्हणणे असल्याने काँग्रेसचे लोक सभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे त्रिणमूल काँग्रेस वर नाराज आहेत. ममता दीदी देखील काँग्रेस बरोबर बंगाल मध्ये युती करणार नाहीत. उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस अस्तित्वात नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादीची २ खासदार निवडून आणण्याकरिता मारामारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ताच काँग्रेस ची लोकं निवडून येत नाहीत. त्यात राष्ट्रवादी फुटल्याने दोघांचे वांदे झाले आहेत. केरळ मध्ये कम्युनिस्ट काँग्रेस ला थारा देत नाही. गुजरात मध्ये काँग्रेस प्रचार करण्याच्या भानगडीत देखील पडत नाहीत. एका चित्रपटात महिला फुटबॉल हाती घेऊन, टेनिस ड्रेस मध्ये, गोल्फ कोर्स वर बास्केटबॉल खेळताना दाखवले आहे. मोदी विरोधी आघाडीचे हेच सत्य आहे. विचारधारा नाही, देशाच्या विकासाची ब्लुप्रिंट नाही, फक्त सत्तेत येऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरणे हे एकमेव उद्दिष्ट.

सध्या I.N.D.I.A नाव ठेवण्यामागे कुणाला क्रेडिट द्यायचे यावरून आप, काँग्रेस, लालू, नितीश आणि ममता यांमध्ये भांडण सुरू आहे. नाव काहीपण केले तरी २००४-२०१४ मध्ये UPA ने देशाचे जे वाटोळे केले ते देश विसरणार नाही. Decade of Decay म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या दशकाला भारत विसरणार नाही. रोज भ्रष्टाचाराच्या नव्या बातम्या. घरातून कामाकरिता बाहेर पडलेला व्यक्ती संध्याकाळी परत सुखरूप घरी येईल याची शास्वती नाही इतके दहशतवादी हल्ले. दर तिमाहीत महागाईचा नवा उच्चांक. अर्थव्यवस्था जगात fragile five economies मध्ये. सामान्य जनता त्रस्त, यांचे नेते मात्र मस्त. या सर्वत्र पसरलेल्या अंधकारला हा देश विसरणार नाही. प्रोडक्ट लेबल बदलले तरी मूळ प्रोडक्ट तोच अशी सत्यावस्था या आघाडीची आहे.

Play Video

Watch as Congress leader Mallikarjun Kharge passionately addresses the crowd about the “I.N.D.I.A alliance,” only to find himself caught in an amusing spelling blunder!

It appears that AAP still doesn’t know the full form of “I.N.D.I.A.” This video shows AAP representatives stumble and fumble over this basic acronym.

या अंधकारात नरेंद्र मोदी हे आशेचा किरण ठरले. रुळावरून घसरलेली देशाची गाडी त्यांनी पुन्हा रुळावर आणली. आज देश नव्या उमदीने New India च्या दिशेने घोडदौड करत आहे. आता काँग्रेस आणि विपक्षांना पुन्हा संधी देऊन ही घडी विस्कटून न देण्याचा जवाबदारी आपल्या वर आहे. एक लक्षात ठेवले पाहिजे कि रावणाने देखील साधूचा वेष धारण करून फसवण्याचेच काम केले होते. ब्रिटिशांनी देखील East India Company मध्ये इंडिया शब्द वापरून भारताला लुटलेच होते. गाढवाने स्वतःला घोडा म्हणले म्हणून काय तो घोड्यासारखा धावू शकत नाही. नाव इंडिया ठेवले म्हणून काही कुणाचे चरित्र सुधारू शकत नाहीत. काँग्रेस पप्रणीत आघाडीने काहीही केले तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी २०२४-साली आयेगा तो मोदी ही…   

It’s as if destiny itself wanted to add a touch of humor to the situation of the opposition parties.

A scenario where each leader from the opposition party gets to be the Prime Minister for a day. From Monday to Sunday, watch as they dive headfirst into the highest office of the country.

Share this article:

Tags: Elections

Leave a Comment

0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Recommended For You

Narendra Modi, Indian Elections, Modi 2.0, Phir Ek Baar Modi Sarkar, Amit Shah, BJP, Bharatiya Janata Party, Vijayi Bharat, Elections 2019, New India

Vijayi Bharat – India Wins Yet Again!

BJP's 2019 election victory is the victory of Indians for a New India. It is the victory of grace, dignity and a commitment to work towards a country we want to see flourish, thrive, grow and compete with the best in the world. We are, Vijayi Bharat.

Read More →

Overlooking Progress: The Idiocy of Pessimism in Modi’s Era

India stands transformed under Modi’s leadership, achieving milestones in infrastructure, security, and economic growth once neglected under Gandhi rule. Yet, persistent pessimism blinds us to this progress. To secure India’s future, voters must embrace decisive leadership and reject divisive dynasties.

Read More →
Devendra Fadnavis, देवेंद्र फडणवीस, Maharashtra, Development, केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र, Dynamic Leader, BJP, Bharatiya Janata Party, Chief Minishter, Deputy Chief Minister, Maharashtra Growth Story, 1 Trillion Dollar Economy, पुन्हा-देवेंद्र, Punha Devendra, Devendra Again

मराठी Lutyens: पाकीट पत्रकारिता​

महाराष्ट्रातील काही पत्रकार पत्रकारिता कमी आणि आपल्या राजकीय मालकांकरिता काम करताना जास्त दिसून येतात. अशी परिस्तिथी असताना आपण सर्वांनी ह्या प्रसार माध्यमांना दूर सारून वास्तव्य जाणून घेण्या करिता परिश्रम घेणे आवध्यक आहे.

Read More →
Narendra Modi, Indian Elections, BJP, Bharatiya Janata Party, Elections 2017, Uttar Pradesh, UP Elections, Yogi Adityanath, Double Engine Sarkar

Saffron UPsurge – Maturing of a Democracy

The latest election results have also established that a good majority of Indians perceive Modi to be a man they can trust, a man who can bring about development, a man who can bring in change, a man who can transform their lives for the better.

Read More →
Narendra Modi, Indian Elections, BJP, Bharatiya Janata Party, Elections 2017, Uttar Pradesh, UP Elections, Yogi Adityanath, Double Engine Sarkar

Playing Judge, Jury and Executioner

The rabble rouser is not the Yogi, but the hate mongering journalists and editors who seek to demean the verdict of the masses. Yogi Adityanath will prove to be a popular and effective Chief Minister, overseeing a regime of peace, harmony and justice for all.

Read More →
Narendra Modi secures his third term.

Teesri Baar Modi Sarkaar

Regardless of what Congress led narratives may claim, the reality is clear: Narendra Modi has won. Despite facing an onslaught of deceit and malice from the Congress, Modi defied all odds and secured a healthy majority and emerged victorious!

Read More →

Electoral Bonds: Congress’s Web of Deceit

Electoral Bonds represented a pivotal shift towards transparency in political financing, aiming to curb the influence of black money in India's democratic process. However, the Supreme Court's decision to invalidate them not only undermines efforts to clean up the system but also serves as a lifeline to the entrenched culture →

Read More →